एन सी सी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : कर्नाटक एअर स्क्वाड्रन NCC, 25 कर्नाटक बटालियन NCC आणि 26 कर्नाटक बटालियन NCC च्या कॅडेट्सद्वारे 73 वा NCC दिवस साजरा करण्यात आला. NCC दिवस दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो. त्यामुळे आज NCC दिवस साजरा केला गेला .यावेळी कर्नल राजीव खजुरिया, कमांडिंग ऑफिसर 26 कर्नाटक बटालियन NCC यांनी सर्वाना संबोधित आणि प्रेरित केले .त्यानंतर लेफ्टनंट कर्नल सीबी नंदकुमार, अॅडएम ऑफिसर 25 कर्नाटक बटालियन एनसीसी बेळगाव यांच्या देखरेखीखाली कॅडेट्सची पाच उपगटांमध्ये विभागणी करण्यात आली.
यावेळी 300 NCC कॅडेट्ससह शिक्षण व नागरी कर्मचारी 3. NCC संकुल जाधव नगर येथे विविध जातींची 60 झाडे लावण्यात आली. तर दुसऱ्या गटातर्फे रक्तदान करण्यात आले .यावेळी संकलित केलेले रक्त BIMS च्या रक्तपेढीचे डॉ. रवींद्र पाटील, डॉ. श्रुती आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या देखरेखीखाली 31 कॅडेट्स आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच तिसर्या गटाने देवराज अर्स कॉलनी येथील वृद्धाश्रमाला भेट दिली यावेळी ४५ कॅडेट्सनी वृद्धाश्रमातील रहिवाशांशी संवाद साधला आणि त्यांना ताजी फळे, ज्यूस आणि इतर खाण्याचे पदार्थ भेट दिले.
तसेच चौथ्या व पाचव्या गटाने गांधी चौकातील पुतळा स्वच्छता व जाधव नगर येथे सफाई अभियान राबविले. NCC ध्वज फडकावल्यानंतर, पहिल्या गटाने 4 वाजता वृक्षारोपण केले. शेवटी सर्व कॅडेट्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आर खजुरिया आणि अॅडएम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सीबी नंदकुमार यांनी चर्चा केली आणि त्यानंतर NCC गाणे आणि राष्ट्रगीत सादर केले. सर्वांना चहा आणि नाश्ता देण्यात आला. ‘NCC दिना’च्या शुभ दिवशी या कार्यक्रमाचा भाग झाल्याने सर्व कॅडेट्सना आनंद झाला. एनसीसी असलेल्या सर्व संस्थांनीही संस्थात्मक स्तरावर एनसीसी दिन साजरा केला. 5. NCC ग्रुप कमांडर कर्नल के श्रीनिवास यांनी देखील बेळगाव आणि गोवा NCC ग्रुपच्या सर्व NCC कॅडेट्स आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच शुभेच्छाही देऊन NCC दिवस साजरा करण्यात आला .