निवेदन आणि डी मीडियाच्या वृत्ताने अधिकारी झाले जागे
बेळगाव : डॉ बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळ कंग्राळी खुर्द यांच्या वतीने कंग्राळी खुर्द येथील सरकारी कन्नड शाळेत असलेल्या गैरसोयी बाबत काल जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच या निवेदना बाबत डी मीडियाने आवाज उठवत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या निवेदनाची आणि वृत्ताची दखल घेत अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी लागलीच आज शाळेत जाऊन तेथील कामाचा शुभारंभ केला.
सरकारी कन्नड शाळेची स्थापना होऊन 23वर्षे झाली. मात्र 23 वर्षे उलटून गेली तरी या शाळेच्या झालेल्या दुरवस्थेकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे होता.त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले होते.
येथील शाळेची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली होती. ही बाब येथील बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळाने निदर्शनास आणून देताच अधिकाऱ्यांनी लागलीच कामाला सुरुवात केली.
शाळेमध्ये आणि शाळेच्या भोवती असलेल्या असुविधांचा अभाव या सर्वांची दखल अधिकाऱ्यांनी घेतली आणि येथील स्वच्छतागृह शाळेच्या भोवती असलेले कंपाउंड तसेच जीर्ण झालेल्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी पीडिओ मट्टू बरगी, पोलीस अधिकारी ,बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.