विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 10 जण रिंगणात
बेळगाव :येत्या 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण दहा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तीन दिग्गजांची नावे पुढे आली होती.
मात्र आता विधान परिषदेच्या दोन जागांसाठी तीन मध्ये लढत होण्या ऐवजी एकूण 10 जणांमध्ये लढत पार पडणार आहे. भाजप काँग्रेस आणि अपक्ष आणि वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांनी या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यामध्ये भाजप पक्षाकडून महांतेश कवटगीमठ त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांनी आणि अपक्ष उमेदवार म्हूणन लखन जारकीहोळी यांनी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला.
याशिवाय संगमेश चिक्कानारगुड, शंकर हेगडे, जगदीश कवटगीमठ, शंकर कुडसन्नावर,गंगी कलमेश, अशोक हंजी, नागाप्पा कळसन्नावर यांनी वेगवेगळ्या पक्षामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 2 जागांसाठी दहा जण रिंगणात आहेत.