भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने पिल्लाला चिरडले
बेळगाव :भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीने कुत्र्याच्या पिल्ल्या ला धडक दिल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना गोवा रोडवर घडली आहे. रस्ते अपघातात कुत्री आणि त्याची पिल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच घटना काल घडली.
यावेळी गोवा रोड वरून जाणाऱ्या सर्व लोकसेवा फाउंडेशनचे विरेश हिरेमठ यांच्या दृष्टीसही बाप पडली यावेळी त्यांनी गाडीतून उतरून रस्त्यावर अवस्थेत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला बाजूला केले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून पुढील प्रवासास निघाले
शहरात अशाप्रकारच्या घटना दररोज घडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग किंवा अन्य ठिकाणी कुत्रे आडवे आल्याने अनेक अपघात होत आहेत. या अपघातात वाहन चालक जखमी होत आहेत किंवा कुत्र्याची पिल्ले जागीच ठार होत आहेत. अशा घटना घडू नये म्हणून वाहनधारकांने आपल्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे बनले आहे.