चंदगडात गायी- म्हशीच्या तस्करीचा संशय…हलकर्णी येथे ट्रकचा भीषण अपघातानंतर काही गोष्टी समोर..
चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे आज(सोमवार) पहाटे अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीचं मृत्यू झाला मात्र सोबत असणाऱ्या दोघांनी जागीच धूम ठोकली. अपघात झालेल्या ट्रक मध्ये हे फक्त तिघे न्हवते तर पाठी 20 ते 25 गाय व बैल होती. ह्या गायी कशासाठी नेल्या जातं होत्या? कोण घेऊन जातं होतं?
अपघात झाल्यानंतर बाकीच्या व्यक्तींनी घूम का ठोकली असे एक नां अनेक प्रश्न आता उपस्थित होतं आहेत. मात्र प्राथमिक माहिती मिळते यावरून बेळगाव- वेंगुर्ला मार्गवर आज पहाटे भरधाव वेगाने ट्रक जातं असताना वळणावर अचानक चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी झाला यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे असणाऱ्या अनेक गायी म्हशीनचा ही मृत्यू झाला. या चालकांसोबत दोन सहकारी होती त्यानी धूम ठोकली अशी माहिती पहाटे व्यायामासाठी गेलेल्या नागरिकांनी सांगितली तर याचं नागरिकांनी उर्वरित गायी- बैलांना बाहेर काढून जीवदान दिलं.