श्रींगारी कॉलनी दीपोत्सव साजरा
बेळगाव : श्रींगारी कॉलनी संघ यांच्या तर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम ग्रीमस स्केटींग रिंग श्रींगारी खासबाग येथे सोमवारी पार पडला. या वेळी 2100 दीप लावण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका प्रीती विनायक कामकर, विनायक कामकर,वडेर गुरूजी, आनंद कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि राम मंदिर रांगोळी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
https://www.facebook.com/731665290548290/posts/1515148765533268/
आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा आणि नदी प्रमाणे आपले जीवन सतत तेवत राहावे या उद्देशाने या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 2100 त्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. तसेच राम मंदिरची रांगोळी काढलेल्या चैतन मुरकुंबी, साई गोविंद चिकोर्डे,नम्रता तुडयेकर,माधवी हिंडलेकर विजेता काकतीकर यांची रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
याप्रसंगी आनंद श्रींगारी, एडवोकेट शिवकुमार उदगिरी,संतोष श्रींगारी, सूर्यकांत हिंडलेकर विश्वनाथ येळ्ळूरकर,अनिल अनवेकर, विनायक काकतीकर प्रकाश श्रेयकर, बाळू मिराशी,संदीप रायकर,शंकर कांबळे सुरेश अशोक गुंजीकर,तुकाराम शिंदे,मलिकाअर्जुन बडिगेर जगदीश चेतन त्यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.