*ऑपरेशन मदत तर्फे ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत गोळ्याळी येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन*
खानापूर तालुक्याच्या दुर्गम खेड्यापाड्यातील मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी त्याचबरोबर मुलांमध्ये शिक्षणात अभिरुची निर्माण व्हावी यासाठी ऑपरेशन मदत तर्फे ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत गोळ्याळी आणि आजूबाजूच्या परिसरातील शालेतील मुलामुलींसाठी सातेरी मंदिराच्या प्रांगणात प्रथमच: सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गोळ्याळी येथील साईनाथ स्व-सहाय्य महिला बचत गटाने आयोजित व ऑपरेशन मदतने पुरस्कृत केली होती. या परीक्षेला (गोळ्याळी व परिसरातील बेटगिरी, तोराळी, देवाचीहट्टी, आमटे, तळावडे, कणकुंबी, पारवाड, चिगुळे व तुडये) अशा जवळपास वीस किलोमीटरच्या परिसरातील दहा शाळांच्या जवळपास 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बस अथवा चालत येऊन या परीक्षेला आपली उपस्थिती दर्शविली.
या स्पर्धांचे उद्घाटन महादेव गुरव, जयवंत देसाई (जिल्हा पंचायत सदस्य जांबोटी), तनुजा गुरव (अध्यक्ष ग्रामपंचायत गोळ्याळी), गावडू गुरव, संभाजी सावंतसर, शिवाजी गुरव यांच्यासह गोळ्याळी महिला मंडळाच्या सदस्या व परिसरातील शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व नागरिक यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धा परीक्षा पाचवी ते सातवी गट व आठवी ते दहावी गट. अशा प्राथमिक व माध्यमिक अशा 2 गटात घेण्यात आल्या. यामध्ये पाचवी ते सातवी गटात कृष्णा बेटणेकर (प्रथम), लक्ष्मण गावडे व लक्ष्मण सुतार (द्वितीय-विभागून), ओमकार सलाम व कार्तिक सावंत (तृतीय-विभागून) तर माध्यमिक गटात नागेश गुरव (प्रथम), संजना दळवी व कृष्णा उशीलकर (द्वितीय-विभागून) तर ज्योतिबा गुरव याने तृतीय क्रमांक पटकावला. वैष्णवी गावकर, रोहित उशीनकर, रोहिनी गावडे, तेजस सलाम, अनिल गावकर, अंकिता सलाम, वासुदेव सलाम, शिवराम कुलम यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धा परीक्षेसाठी एल.एस. येळ्ळूरकर (मुख्याध्यापक MHPS गोल्याळी), संभाजी सावंत (MHPS हब्बनहट्टी) व गुंडू चौगुले (गोल्याळी)
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विजेत्या स्पर्धकांना ऑपरेशन मदत पुरस्कृत चषक व रोख रक्कम देऊन अभियानचे सदस्य प्रसाद हुली, विठ्ठल देसाई, राहुल पाटील, व साईनाथ स्व-सहाय्य महिला मंडळाच्या सदस्या
सरस्वती चौगुले, सुजाता गुरव, आरती चौगुले, भागिरथी गुरव, पुनम चौगुले, शिल्पा गुरव, सत्यभामा चौगुले, सुहानी दळवी, राची गावडे व पार्वती गवस यांच्या हस्ते कार्यकर्ते गौरविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि गावकरी सातेरी मंदिराच्या प्रांगणात उपस्थित होते.