त्या जागेवर पोलीस स्थानक उभारण्याचा प्रस्ताव
बेळगाव : खंजर गल्ली येथील एका अडीज एकर जागेचा बेकायदेशीर उपयोग होत आहे. त्यामुळे या जागेचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा यासाठी आमदार अनिल बेनके यांनी प्रस्ताव मांडला आहे. याठिकाणी मार्केट पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस स्टेशनला सदर अडीज एकर जागेत जागा उपलब्ध करून देण्याची चर्चा सध्या सुरू असून लवकरच खंजर गल्लीतील त्या बेकायदेशीर जागेचा चांगल्या कामासाठी उपयोग होणार आहे.
https://www.facebook.com/DMEDIA24/videos/309191441027203/
मार्केट पोलिस स्टेशनचे कामकाज करण्यासाठी अपुरी जागा उपलब्ध आहे. तसेच उत्तर रहदारी वाहतूक पोलीस स्थानकाचे कामदेखील शिवबसव नगर येथे भाडे तत्वावर सुरु आहे. यामुळे या दोन्ही स्थानकाला सर्व सोयी सुविधांनीयुक्त खंजर गल्लीत जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे आज आमदार अनिल बेनके , महानगरपालिकेचे आयुक्त रुदरेंद्र घाळी, याच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी खंजर गल्लीतील जागेची पाहणी केली.