बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी आणि यमनापूर बॉईज यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून दिनांक 15 नोव्हेंबर पासून या शिबिराला प्रारंभ करण्यात येणार आहे.
गौडवाड येथे सकाळी साडेसात ते साडेनऊ च्या वेळेत ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना प्रशिक्षक सूनील देसाई व वीरेश गौडर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या शिबिरातून 12 वर्षाखालील 14 वर्षाखालील व 19 वर्षाखालील संघ तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवार व रविवारी सराव सामने खेळविण्यात येणार आहेत.
यमनापुर,गौंडवाड,काकती,कंग्राळी,मुत्यानट्टी,वैभव नगर या भागातील उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी आर अँड बॉईज नारायण पाटील बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक सुनील देसाई. नावाजलेले क्रिकेट खेळाडू वीरेश गौडर यांच्याशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना गौंडवाडचे नावाजलेले क्रिकेटपटू मनोज पाटील यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.