अंगणवाडीत साजरा झाला बालदिन
बेळगाव : 14 नोव्हेंबरला पंडित नेहरू यांचा जन्मदिन असल्याने हा दिवस बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा रविवारी बालदिन आल्याने काही शाळांमध्ये शनिवारीच बाल दिन साजरा करण्यात आला. मात्र ज्योती नगर गणेशपूर येथील अंगणवाडी रविवारी सकाळीच बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अंगणवाडीतील मुलांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करून बाल दिनाची शोभा वाढवली. प्रारंभी पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. बाल दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संदीप लाखे उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांचे स्वागत अंगणवाडी शिक्षकांनी केले. याप्रसंगी अंगणवाडी शिक्षिका मंदा नेवगी,शमला तलवार उज्वला लाखे, तयवा कल्पत्री उपस्थित होते.