आयिका “च्या 5 कराटेपटूंनी मिळविला ब्लॅक बेल्ट
ऑल इंडिया कराटे डू अकॅडमीच्यावतिने घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट कराटे परिक्षेत बेळगावच्या एआयकेए (आयिका) ग्रुपच्या 5 कराटेपटूंनी सुयश संपादन केले आहे. गुजरातमधील भरुच येथे सिहान कल्पेश मकवाना यांच्या परिक्षणाखाली ही कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात आली होती.
दिया डी. बनस्कर, ईशान ए. करगुप्पीकर, साक्षी पी. पवार, उर्वी व्ही. कुमठेकर आणि वैष्णवी आर. व्हनमनी अशी ब्लॅक बेल्ट संपादन केलेल्या कराटेपटूंची नावे आहेत.
कराटे मास्टर दीपक काकतीकर आणि सहाय्यक प्रशिक्षक अमित वेसणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कराटेपटूंनी कराटेचा सराव केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.