बसच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे हेही वर्ष वाया जाणार का?
बेळगाव: कोरोनामुळे शैक्षणिक वर्षावर गदा आली. त्यामुळे कोरोना काळात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. गेल्या वर्षी होणाऱ्या आयटीआय,एससीटी परीक्षा यावर्षी घेण्यात येत आहे. येथील मजगाव मधील सरकारी आयटीआय कॉलेजमध्ये आयटीआय आणि एससीटी परीक्षेचा पेपर आज पासून सुरू झाला आहे.मात्र बस वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.

मजगाव येथे एकच परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थ्यांना याठिकाणी येणे अनिवार्य आहे. मात्र बसच्या अपुऱ्या आणि अनियमित सेवेमुळे परीक्षा केंद्राबाहेर थांबावे लागत आहे.परीक्षेचा कालावधी हा 9.30 ते 12 पर्यंत आहे. मात्र बस वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
आधीच कोरोनामुळे दोन वर्षे कॉलेज बंद होते. मात्र आता कोरोना आटोक्यात येताच परीक्षा घेण्यात येत आहे.तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास हा ऑनलाईन द्वारे झाल्याने त्यांना परीक्षा देण्यास अडचणी येत असून देखील वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना ससेमिरा सोसावा लागत आहे