वेगवेगळ्या समुदायांना यांनी केले स्पिकर व खुर्च्यांचे वितरण
बेळगाव : सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने विविध समुदायांना स्पीकर आणि खुर्च्या देण्यात आल्या. सदर कार्यक्रम जाधव नगर येथील कार्यालयात पार पडला. यावेळी राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते मराठा, लिंगायत जैन,दलित,मुस्लिम यासह अनेक समुदायांना प्रत्येकी 50 खुर्च्या आणि एक स्पीकर देण्यात आले.
यावेळी बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदार क्षेत्रातील एकूण 10 समुदायांना वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन त्याकरिता खुर्च्यांचे वितरण करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच येणाऱ्या काळात देखील सर्व समुदायांना खुर्च्या वितरीत केल्या जातील अशी ग्वाही राहुल जारकीहोळी यांनी दिली.
याप्रसंगी केपीसिसी सदस्य मलगौडा पाटील,यांच्या सह अन्य सदस्य उपस्थित होते.