भगवे वादळ संघाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकोटांचे महत्त्व आजच्या पिढीला समजण्यासाठी भगवे वादळ नेहमी प्रयत्नशील असते. तसेच भगवे वादळ युवक संघाच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. अशाच प्रकारे दिवाळीनिमित्त या संघाच्या वतीने किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी लोकमान्य रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या पूजनाने करण्यात आली त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवव्याख्याते अनिल चौधरी यांनी महाराजांचा इतिहासाबद्दल कार्यक्रमात माहिती दिली. स्पर्धेत 53 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी ळी विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वजीत हसबे, नगरसेवक जयतीर्थ सवदती, भगवे वादळ संघाचे अध्यक्ष प्रसाद मोरे उपाध्यक्ष, महेश काकतकर, नगरसेवक संतोष पेडणेकर शंकर पाटील शिवाजी मंडोळकर उपस्थित होते.