फिर्यादीदारांचा मुद्देमाल केला परत
गेल्या 22 महिन्यांमध्ये 206 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वेगळ्या प्रकरणाचा छडा लावून जिल्हा पोलीसांनी 8 कोटी 58 लाख 23 हजार 999 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोऱ्या, घरफोडी, दरोडे,वाहनचोरी अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल संबंधितांना न्यायालयाच्या आदेशावरून परत करण्यात आला.
वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरी झालेले सोन्या-चांदीचे दागिने, मोटर सायकली, रोकड पोलिसांनी फिर्यादीदारांना आणि संबंधितांना न्यायालयाच्या आदेशावरून परत केल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच पोलिस परेड मैदानावर जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधितांना परत करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यात आली