आणि अंगणवाड्या झाल्या सुरु
बेळगाव : गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद असलेल्या अंगणवाड्या आज सुरू झाल्या. रुक्मिणी नगर मधील आश्रय अंगणवाडी अनिल बेनके यांच्या हस्ते उघडण्यात आली .यावेळी त्यांनी सर्व पालकांना आपली मुले अंगणवाडीत सुरक्षित असणार आहेत असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी ते बोलताना म्हणाले की राज्यात 5321 अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सर्व ती सुरक्षा बाळगून अंगणवाड्या सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. अंगणवाडी सेविकांचे लसीकरण करून त्यांना अंगणवाडी चालविण्याचे आदेश आल्याने दीड वर्षापासून बंद असेल अंगणवाड्या सध्या सुरू झाल्या आहेत.
कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने सर्व ती आवश्यक खबरदारी राज्य सरकारने घेतली आहे. तसेच सर्व अंगणवाड्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षांपासून अंगणवाड्या बंद असल्याने लहान मुलांचा बौद्धिक विकास खुंटला होता.
मात्र आता अंगणवाड्या सुरू केल्यामुळे लहान मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकास होणार आहे.
अंगणवाडीत देण्यात येणारे आहार हे पोषक असून तेही सर्व सुरक्षा बाळगून मुलांना यांना देण्यात येणार आहे. असे यावेळी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. यावेळी महिला आणि बालकल्याण विभागाचे बसवराज वरवट्टी, अंगणवाडी सेविका यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.