सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून दुर्दैवी अंत
तलावात बुडून सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना सांबरा येथे घडली आहे. नेत्रा कोळवी वय 8व प्रिया कोळवी वय 6 अशी मृत झालेल्या बहिणींची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की देव पूजेचे साहित्य विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तीन बहिणींपैकी दोघींचा मृत्यू झाला. तर मोठी बहीण संध्या कोळवी वय दहा वर्षे हिला वाचविण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य भुजंग गिरमल आई माझी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी तलावात उडी टाकून सदर मुलींना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र केवळ एका मुलीला वाचविण्यात यश आले. तलावात बुडालेल्या 3 बहिणींपैकी एकटीला वाचविण्यात यश आले मात्र दोघींचा दुर्दैवी अंत झाला.
सदर घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास महादेव तलावात घडली असून तिघीनाही खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र याचा काहीही उपयोग न झाल्याने दोघींचा अंत झाला
. केवळ सुदैवाने मोठी मुलगी या घटनेत बालबाल बचावली.
मृत मुलींचे वडील हे गोकाक जवळील येड्डलगूडचे असून भारतीय सैन्य दलात सेवा बजावतात ते सांबरा येथे भाडोत्री घरात राहत असून त्यांचे नाव इराप्पा कोळवी असे आहे.. गेल्या आठ दिवसांपूवी ते आहे कारवारला सैन्य दलात सेवेत सुट्टी संपून रुजू झाले होते. तर त्या मुलींची आई तिचे माहेर कोन्नूर ला गेली होती. ती रविवारी दुपारी घरी परतली. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.