अस्मिता इंटरप्राईजेसच्या रांगोळी ,चित्रकला ,निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
बेळगाव : नुकताच अस्मिता इंटरप्राईजेस च्या वतीने रामनाथ मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या रांगोळी चित्रकला निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे सदर स्पर्धा दीपावलीनिमित्त अस्मिता इंटरप्राईजेस च्या वतीने घेण्यात आल्या होत्या.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट करुणा रेवणकर, श्रुतिका हलगेकर,चिन्नास्वामी अस्मिता इंटरप्राईजेसचे राजेश लोहार,अतित बेलेकर, सुनील पवार, सोमनाथ हलगेकर,अनंत लंगरकांडे अमित लोहार,मारुती लोहार, सुमित सुतार उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन विकी तहसीलदार यांनी केले.यावेळी उपस्थित पाहुण्यांचा आणि स्पर्धकांचे आभार मानण्यात आले.
यावेळी प्रत्येक स्पर्धेत तीन गट करण्यात आले होते. पाचवी ते सातवी आठवी ते दहावी आणि ओपन गट महिला असे भाग करण्यात आले होते. यावेळी रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात सपना जाधव नम्रता माधव आणि स्वाती अनगोळकर यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. तर आठवी ते दहावी या गटात प्रज्वल बँकी,तेजस्विनी लोहार, ऋतुजा लोहार त्यांनी अनुक्रमे बक्षिसे मिळविली. तर ओपन गटात सौजन्य बनसोडे,सुषमा बनसोडे आणि पूजा जाधव यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.
सतीश चित्रकला स्पर्धेत पहिली ते चौथी या गटात आसावरी कुंभार,कृष्णा गौंडवाडकर कुलदीप मधुकर यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. तर पाचवी ते सातवी या गटात मानसी गेंजी, वैष्णवी बडमंजी आणि सर्वेश रेवणकर त्यांनी बक्षिसे मिळविली. तर आठवी ते दहावी या गटात यश पाटील निहार मधुकर आणि दत्तगुरु धुरी यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.
तसेच निबंध स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात शुभांगी लोहार श्रावणी हलगेकर आणि जयश्री लोहार यांनी प्रथम द्वितीय क्रमांक पटकाविला. तर आठवी ते दहावी निबंध स्पर्धेत रोशनी कित्तूरकर, रिहा सोमाईचे,जयदीप नाडकर्णी यांनी बक्षिसे मिळविली.
तसेच हस्तांतरित स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती यावेळी पाचवी ते सहावी या गटात श्रावणी हलगेकर वैभवी बडमंजी, यश पाटील यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. तर आठवी ते दहावी या गटाची रोशनी कित्तूरकर, रोशनी तारीहाळकर आणि प्रिया कोलेकर यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविला.