फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे एक अनोखा उपक्रम
दिवाळी निमित्त फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला.रस्त्यावर बसून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या वयोवृद्ध महिला विक्रेत्यांना दिवाळी निमित्त साडीची भेट देण्यात आली.
अनेक वयोवृद्ध महिलाना परिस्थितीमुळे उतारवयात देखील बाजारात रस्त्यावर बसून विविध वस्तूंची विक्री करून अर्थार्जन करावे लागते.त्यांना तुटपुंज्या उत्पन्नामध्ये दिवाळी साजरी करता येत नाही.ही बाब ध्यानात घेवून फेसबुक फ्रेंडस सर्कलचे संतोष दरेकर यांनी रेनबो साडीजच्या मदतीने शंभर हून अधिक रस्त्यावर बसून फुले,रांगोळी,फुले,भाजी विकणाऱ्या महिलाना दिवाळी निमित्त साडीची भेट दिली.मैत्रेयी विश्वास यांच्या हस्ते बाजारपेठेत फिरून महिलांना साडीची भेट देण्यात आली. साडी स्वीकारताना या वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.किरण निपाणीकर, वरुण कारखानीस यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला होता.