ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त यांनी दिला बोनस
बेळगाव : येथील ग्रामपंचायत सदस्य यल्लोजी पाटील यांच्या वतीने कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले .सदर कार्यक्रम ग्रामपंचायतीत पार पडला.यावेळी यल्लोजी पाटील यांनी स्वतः कर्मचाऱ्यांना बोनस दिला .
ग्राम पंचायती मध्ये दिवाळी निमित्त बोनस देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही .यावेळी बोनस दिल्याने सर्वानी एकमेकांसोबत आपला आनंद द्विगुणीत केला. यावेळी यल्लोजी पाटील यांनी सर्वाना मिठाईचे वाटप केले आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या .