भारतनगर येथील विनायक विजय दळवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन : परिसरात होतेय हळहळ व्यक्त
बेळगाव : भारत नगर, चौथा क्रॉस येथील रहिवाशी विनायक विजय दळवी यांचे मंगळवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.निधनसमयी ते 32 वर्षांचे होते.
यांच्या पश्चात आई, वडील, बहिण, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
आज बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता भारत नगर येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढून शहापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनायक मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्यामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.