सीमालढा आजही धगधगता
बेळगाव :1956 पासून चालत असलेला सीमावासियांचा लढा आजही धगधगता आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्राचा काही भाग कर्नाटकात डांबण्यात आला त्यामुळे मराठी भाषिकांवर अन्याय झाला. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सीमा बांधाव एक नोव्हेंबर दिवशी काळा दिन साजरा करतात. यंदाच्या या काळ्या दिनाला कर्नाटक सरकारने कोरोनाचे चे नियम पुढे करत मूक सायकल फेरीवर गदा आणली. मात्र त्याचवेळी हजारोंच्या संख्येने कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राज्योत्सव च्या ठिकाणी कोरोना चे नियम पायदळी तुडवले गेले आणि पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले होते. अशी सडसडीत टीका काळ्या दिनी झालेल्या या आंदोलनात ठिय्या आंदोलनात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले
कर्नाटक सरकारने मराठी माणसांवर दबाव आणून मुक्त सायकल फेरी रद्द केली. मात्र चन्नम्मा सर्कल मध्ये राजोत्सव धूम धड्याकात आज साजरा करण्यात आला. हा कोणता न्याय झाला असा सवाल मराठा मंदिर मध्ये काळ्या दिनी झालेल्या धरणे आंदोलनावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी सर्वांनी काळे कपडे, हाताला काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध केला. त्याप्रसंगी एक सीमा बांधवांनी सीमाप्रश्नाच्या सोडवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
रहेगी तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे जय महाराष्ट्र, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी अनेकांनी आपले मत मांडून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
मराठी बांधव लोकशाही मार्गाने आपला लढा लढत आहे. मात्र कर्नाटक सरकार या लढ्यात ही त्यांची गळचेपी करत आहे, कर्नाटक सरकार कितीही प्रयत्न करू दे आम्ही नमणार नाही दबणार नाही किंवा बळी पडणार नाही न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. आम्ही सर्व मराठी बांधव संघटित आहोत एकत्रित आहोत सीमा प्रश्नांची सोडवणूक हाच आमचा मूळ हेतू आहे समितीमध्ये गटबाजी आहे असे म्हणणाऱ्यांना आम्ही वेळोवेळी शाब्दिक चपराक दिली आहे. महिलांच्या तरुणांच्या युवपिढीच्या आणि ज्येष्ठांचे मत जाणून घेऊन या लढ्याला आम्ही दिशा देऊ असे बोलताना दीपक दळवी म्हणाले.
तसेच सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत सीमावासीय आपला हा लढा कायम तेवत ठेवतील आपल्या मराठीसाठी प्रत्येक शिवाजीमहाराजांच्या लढवय्या वेळोवेळी रस्त्यावर उतरून कर्नाटक सरकारची झुंज देण्यास आणि न्याय मिळवून देण्यास खंबीर आहेत, महाराष्ट्रातील नेते म्हणाव्या तितक्या ताकतीनिशी आपल्या पाठीशी नाहीत , त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर एकत्र येऊन सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रत्येकाने हात लावावा असे मत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले
तसेच यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी देखील आपले मत मांडले. यावेळी ते म्हणाले की सीमाबांधवांना घटनेने दिलेला अधिकार मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून भीक मागण्याची वेळ आली आहे. ही गोष्ट सीमा बांधवांसाठी लज्जास्पद आहे. तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला हा लढा असाच चालू राहील असे यावेळी ते म्हणाले.
त्यामुळे अनेक समिती नेत्यांनी आपले मत मांडले. आणि कर्नाटक सरकार करत असलेली दडपशाही कदापि खपवून घेतली जाणार नाही प्रथम निर्धार व्यक्त केला तसेच घटनात्मक हक्कांची पायमल्ली ही लोकशाहीची चेष्टा असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. जोपर्यंत सीमालढ्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असा निर्धार यावेळी सीमाबांधवांनी केल्याचे दिसून आले.