यातील फक्त एकाची ओळख पटली…
एम के हुबळी :पोहता येत नसल्याने दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एम के हुबळी येथे रविवारी सकाळी घडली. कांतेश बडिगेर वय 25 राहणार गोकाक तालुका कोन्नूर असे युवकाचे नाव असून अद्याप एका युवकांची माहिती मिळविण्यासाठी पोलीस शोध घेत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की रविवारी सकाळी एम के हुबळी येथील तलावाकडे गेलेले हे दोन तरुण पाय घसरून तलावात पडले त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला बोलावून घेतले यावेळी अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम सुरू करून मृतदेह तलावाच्या बाहेर काढला.
मृत्यू झालेल्या दोन तरुणांपैकी एकाची ओळख पटली असून दुसऱ्या तरुणाची ओळख पटविण्यात येत आहे. कित्तुरचे सीपीआय देवराज उळागड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास हाती घेतला आहे.