दूध उत्पादकांच्या मुलांकरिता विद्यार्थी निवासाचे बांधकाम हाती
बेळगाव :कर्नाटक दूध महामंडळ बेंगळुर आणि बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ युनियन यांच्यावतीने येथील कणबर्गी रोड वरील नंदिनी डेअरी नजीक दूध उत्पादकांचा मुलांमुलींकरिता विद्यार्थी निवास उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी निवास बांधकामाचे व नूतन बॉयलरचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.
यावेळी सदर शुभ कामाचे भूमिपूजन बेळगाव जिल्हा व कर्नाटक दूध उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी, कारंजीमठचे गुरुसिद्ध महास्वामी,आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी नगरसेवक राजू शेखर एम डोनी, विवेक पाटील उपस्थित होते.
सदर कामाचा शुभारंभ आज पार पडला असून यासाठी तीन कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच दुध उत्पादकांच्या मुलामुलींकरिता या विद्यार्थी निवासात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जवळपास पन्नास मुली आणि 50 मुलांना यामध्ये राहण्याची सोय मिळणार आहे.