रामनाथ मंगल कार्यालयात हॅण्डमेड उत्पादनांचे प्रदर्शन
बेळगाव :देशपांडे फाउंडेशनच्या वतीने दिनांक 29 ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान मेगा उद्यमी संते प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता भाग्य नगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या उदघाट्ना प्रसंगी टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार,डीआयसीचे संचालक भीमप्पा एनएम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच आपणाला या प्रदर्शनात वस्त्र, हातमाग हस्तशिल्प, टेरा कोटा, हँडलूम आणि हॅन्ड पॅन्ट केलेल्या साड्या,लंबाडी वस्त्रे,इकोफ्रेंडली ॲक्सेसरीज,उत्पादने कॉस्मेटिक्स या प्रकाराचा अनेक हॅन्डमेड उत्पादनांची खरेदी करता येणार आहे.
सदर प्रदर्शन दिनांक 29 ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या दरम्यान सकाळी साडेदहा ते रात्री नऊ पर्यंत रामनाथ मंगल कार्यालय भाग्यनगर येथे सर्वांसाठी खुले असणार आहे. तरी या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.