बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या शंभरहून अधिक लॉजना पोलिसांनी भेट देवून अचानक तपासणी केली.पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री शहरातील लॉजना अचानक भेट देवून पाहणी केली.यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी लॉज मालक आणि व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधून त्यांना सूचना केल्या. प्रत्येक लॉजमध्ये सी सी टी ची कॅमेरे बसवणे.सगळ्या ग्राहकांच्या कडून ओळखपत्र घेणे. लॉज मध्ये वास्तव्यास येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची नोंद रजिस्टर मध्ये ठेवणे.लॉज मध्ये राहण्यास आलेल्या व्यक्तीचे वर्तन संशयास्पद वाटल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस स्थानकात देणे.लॉज मध्ये कोणत्याही तऱ्हेचे बेकायदेशीर कृत्ये चालू नयेत याची खबरदारी घेणे अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी लॉज मालक आणि व्यवस्थापक यांना केल्या.यावेळी लॉजच्या खोल्यांची तपासणी आणि पाहणी देखील पोलिसांनी केली.लॉजची पाहणी करण्यासाठी पोलिसांच्या पन्नास टीम नेमण्यात आल्या होत्या.