शहरात सहा ठिकाणी बोरवेलचा शुभारंभ
बेळगांव : उन्हाळ्यात शहरात पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे उन्हाळ्याआधी पाणीटंचाई दूर करण्याकरिता आणि खबरदारीचा उपाय म्हणून शहरात सहा ठिकाणी आमदार अनिल बेनके यांनी बोरवेलच्या कामाला चालना दिली आहे.
चिक्कू बाग हनुमान नगर, मार्कंडेय नगर, केएसआरपी क्वाटर्स एपीएमसी, खडे बाजार,फुलबाग गल्ली, भांदुर गल्ली याठिकाणी कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत बोरवेलच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
उन्हाळ्यात आठ दिवसाआड शहरात पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाण्याकरिता वणवण फिरावे लागते, तर काहींना पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ येते . शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
त्यामुळे ही समस्या जाणून घेऊन आमदार अनिल बेनके यांनी शहरातील सहा ठिकाणी बोरवेलचे काम सुरु कामाला चालना दिली आहे. तसेच नागरिकांनी बोरवेलच्या जपून वापर करावा, आणि इतरांनाही करण्यास द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.