दानम्मा देवीच्या पुराणाचे आयोजन
श्री जगज्योती बसवेश्वर कल्याण मंडप ट्रस्टच्या वतीने सोमवारी श्री दानम्मा देवीच्या पुराणाचे आयोजन करण्यात आले होते.महात्मा फुले रोड येथील श्री दानम्मा देवी मंदिरात पुराण प्रवचन पार पडले.श्री जगज्योती बसवेश्वर कल्याण मंडप ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी यांच्या अध्यक्षतेखाली पुराण प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.
दानम्मा देवी मंदिराचे पुजारी विरेश मठद यांनी पुराण प्रवचन केले.पुराण प्रवचन कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष जी. आर. चोंण्णद,सचिव सी.एम.कितुर ,सहसचिव एम.के. तेलसंग यावेळी उपस्थित होते. पुराण प्रवचनाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.