राज्यातील शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालय गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली. मात्र प्राथमिक शाळा कधी सुरू करणारा हा निर्णय अद्यापही झाला नसल्याने सर्वजण प्रतीक्षेत बसले होते. मात्र आता 25 ऑक्टोबर पासून राज्यातील पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.
त्यामुळे आता राज्यातील प्राथमिक शाळा 50% क्षमतेसह सुरू राहणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना बसण्याच्या आसनात सामाजिक अंतर राखले जाणार असून दररोज वर्ग स्वच्छ केले जाणार आहेत. तसेच लसीकरण झालेल्या वर्ग शिक्षक आणि विषय शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची परवानगी मिळाली आहे .यासोबतच वर्गात उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे आवश्यक आहे.
वर्गातील प्रत्येक तासानंतर, स्वच्छतागृह आसन व्यवस्था आणि इतर भाग निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश सरकारने शाळांना दिले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वर्गात बसायचे नसल्यास त्यांच्यासाठी ऑनलाईन शालेय शिक्षणाचा पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला आहे.
आणि जलतरण तलावाला ही मिळाली परवानगी
कोरोनाचे संक्रमण असल्याने राज्यातील जलतरण तलाव कित्येक दिवसांपासून बंद होते. मात्र आता जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने चालू करण्याची परवानगी मिळाली नसली तरी 50 टक्के क्षमतेसह आता जलतरण तलाव सुरू होणार आहेत.