बेनकनहळ्ळी येथील भव्य गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
खास दसरा दिवाळीनिमित्त मौजे बेनकनहळ्ळी गावात श्री शिवछत्रपती स्वाभिमानी गोटमारा इलेव्हन मंडळातर्फे बीपीएल प्रीमियर लीग भव्य गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धा चे उद्घाटन करण्यात आले. रविवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन बेनकनहळ्ळी येथील समाजसेवक सातेरी लाड आणि कृष्णा देसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी गणेश फोटो, छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन, संभाजी महाराज फोटो पूजन, सरस्वती फोटो पूजन, हनुमान फोटो पूजन, लक्ष्मी फोटो पूजन आणि विठ्ठल रखुमाई फोटो पूजन, ग्राउंड पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि मैदानावरील यष्टी पूजन भाजप ए सी मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य पृथ्वीसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन रेड ग्रुप स्पॉन्सर आणि ब्ल्यू ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले.
स्पर्धेत आठ संघांनी भाग घेतला असून प्रथम क्रमांकाच्या संघाला सातेरी लाड यांच्या कडून 25001 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकाला कै ह भ प लक्ष्मण देसुरकर व बंधू यांच्यावतीने 20001 देण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच म्हणून वैयक्तिक बक्षिसे ती देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष प्रेमा हिरोजी, महेश फगरे, आनंद चव्हाण, रामचंद्र मन्नोळकर, यल्लाप्पा देसुरकर, उमेश चोपडे, महेश सांबरेकर, रंजना नाईक, नारायण झंगरुचे, रंजना कोलकर, सागर लाखे, मलाप्पा हिरोजी, शिवाजी कोलकार, महेश पाटील, सुजाता बटकुरबी, मोहन कांबळे, यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
#ipl #criketlover #bpl