देवीच्या नावे गरजूंची करा मदत
बेळगाव: या समाज सेवकाने केले नवदुर्गा पूजन दसरा यावेळी नवरात्र नऊ दिवस दुर्गा मातेची पूजा आरती करून ओटी भरून आपण मोठ्या उत्साहाने देवीचे पूजन करतो. अशावेळी समाजसेवक आकाश हालगेकर यांचा उद्देश असा आहे. की देवाला दान करण्यात इतके मोठे होऊ नका देवाच्या नावाने गरजू लोकांना सहाय्य करा असा संदेश यांनी समाजाला दिला आहे.
किल्ल्यातील दुर्गा देवी मंदिर, आरटीओ जवळील हनुमान मंदिर, कपलेश्वर येथील महादेव मंदिर या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मंदिर जवळ असलेल्या निराधार महिला यांना देवी स्वरुप समजून त्यांची ओटी भरून स्त्रिया या खरोखर आदिशक्ती दुर्गा मातेचे रूप असतात. हे त्यांनी आज दाखविले आहे ओटीमध्ये साडी ,खन नारळ, पाच फळ देऊन ओटी भरण्याचा कार्यक्रम त्यांनी पार पाडला. याकरिता आकाश हलगेकर, संतोष हलगेकर, विनायक पाटील ,अमोल चौगुले, विनायक चंपन्नवर ,गजू विटेकर या सर्वांनी हा कार्यक्रम करून स्त्रियांचा सन्मान केला.