राम मंदिराच्या चौकट कार्यक्रमाचे पृथ्वीसिंग यांच्याहस्ते पूजन
बेळगाव : देसूर बसवाण गल्ली, राम चौक येथील राम मंदिराच्या चौकट उभारणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वीसिंग फाऊंडेशनचे चेअरमन व भाजप ए सी राज्य कार्यकारणी सदस्य पृथ्वीसिंग, जस्विर सिंग आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल उपस्थित होते. https://www.facebook.com/DMEDIA24/videos/4327726077345442/
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणपती, सरस्वती, मारुती यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न कोरोना वॉरियर म्हणून काम केलेल्या पृथ्वीसिंग यांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य सतीश चव्हाण,समाज सेवक भरमाना पाटील ,पंकज घाडे,सामाजिक कार्यकर्ते हणमंत चव्हाण, गंगाराम मजुकर, बी जी पवार, मष्णू पाटील ,सिद्दबसप्पा पवार, भाऊ पोटे, दशरथ उसुलकर, नागो नाईक, विनोद गुरव ,अनिल पाटील,कल्लाप्पा सावंत, अजित देसाई, नारायण गोरे,स्नेहल कुंभार,निकिता निलेश सुतार,विद्या मानवाडकर,कविता गुरव ,लक्ष्मी पाटील यांच्यासह
मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य व गावातील युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या चौकट पूजन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.