एका बैठकीमुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत
बेळगाव :गेल्या दोन दिवसापूर्वी खासदार मंगला अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांनी महानगरपालिकेत तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्याचा परिणाम अधिकाऱ्यांवर झाला असून आज शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत होता. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. ही बाब आमदारांच्या लक्षात येताच त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरून चांगलेच खडसावले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी शहरात सुरळीत पाणीपुरवठा केला आहे. तसेच एकमेकांच्या समन्वयातून शहरातील विकास कामे करण्याची गती वाढली आहे.
या सर्वांमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून आमदारांनी अशा अधून मधून बैठका बोलवाव्यात अशी मागणी होत आहे.