आमदारांनी दिली विविध विकास कामाला चालना
बेळगाव : कणबर्गी येथील वाल्मिकी गल्ली आणि रामतीर्थ गल्लीच्या विकास कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच वंटमुरी कॉलनी, बसवनकोळ , मुत्यानट्टी आणि यमनापूर अंतर्गत येणारी सर्व विकास कामे ही हाती घेण्यात आली आहेत. सदर काम एकाच दिवशी हाती घेण्यात आली असून ठिकाणी प्रथम चोवीस तास पाणीपुरवठा नळजोडणी करण्यात येणार आहे.त्यानंतर ड्रेनेज, गटारी आणि रस्ते याचे काम हाती घेण्यात येणार आहे.सदर कामाचा शुभारंभ आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला.
या कामासाठी 4.5 कोटी रुपयांचा खर्च येणार असून लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आज या सर्व ठिकाणी कामाचा शुभारंभ करण्यात आला असून यावेळी गावातील पंच समिती, नगरसेवक, पदाधिकारी, पीडब्ल्यूडी अधिकारी, महामंडळ अभियंता आणि रहिवासी उपस्थित होते.
यासोबतच राष्ट्रीय महामार्ग 4 केएलई हॉस्पिटल ते रेट्रो रिफ्लेक्टिव्ह बोर्ड ऑफ वेलकम आर्काइव्ह फॉर परफॉर्मेड येथील विकास कामाचे भूमिपूजन ही करण्यात आले.सदर काम अर्बन डेव्हलपमेंट अॅथोरिटी म्हणजे (BUDA) अंतर्गत घेण्यात हाती घेण्यात आली आहे. यासाठी जवळपास 14 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.