पारंपारिक दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी आमदार अनिल बेनके व देवस्थान कमिटी यांच्याकडून विनंती अर्ज
बेळगांव , दिनांक ० ९ ऑक्टोंबर २०२१ रोजी पुढे येणाऱ्या दसऱ्याच्या पालखी आणि सिमोलंघणाच्या कार्यक्रमाची वेळेची परवाणगी वाढवून द्यायला आज बेळगांवचे जिल्हाधिकारी श्री एम जी हिरेमठ व बेळगांवचे पोलिस कमिशनर यांची आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वामध्ये महामंडळाच्या सदस्यांबरोबर भेट घेण्यात आली . दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक सुप्रसिद्ध असलेले दसरा महोत्सव , पालखी उत्सव , कॅम्पमधील देवी रथोत्सव , सिमोलंघन कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही करण्यासाठी बेळगांव येथील देवस्थान कमिटी , पालखी कमिटी तसेच कॅम्प येथील ५ देवतांचे रथोत्सव कोविट नियमानुसार करण्यात येईल . हा सण साजरा करण्यासाठी आधिच्या वेळे पेक्षा वेळ वाढवून द्यावा असा विनंतीपुर्वक आग्रह दोन्ही अधिकाऱ्यांच्या समोर मांडला . त्यांनी आमदार अनिल बेनके व मंडळाच्या विनंतीस मान देवून अनुमती दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली . या संदर्भात रंजित चव्हान – पाटील , रमाकांत कोंडुसकर , सुनिल जाधव , लक्ष्मण किल्लेकर , कॅम्प मंडळ पदाधिकारी , देवस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते .