कारंजीमठाच्या सुशोभिकरणाचे काम लवकरच होणार पूर्ण
बेळगाव :शहरातील पर्यटन स्थळे, सार्वजनिक ठिकाणी यासह अनेक ठिकाणाचा कायापालट करण्यात येत आहे. त्याबरोबरच
शिवबसव नगर येथील कारंजी मठाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे आमदार आणि बेनके यांनी शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी शिवबसव नगर मधील कारंजी मठाच्या सुशोभीकरण कामाची पाहणी केली. आणि या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी आमदार अनिल बेनके यांनी मठाचे श्री श्री श्री गुरु सिद्ध स्वामी जी यांचा आशीर्वाद घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच येथील मठाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले.