कांगली गल्लीच्या देवीचे रूप डोळ्याचे पारणे फेडणारे
बेळगाव : ढोल ताशाच्या गजरात कांगली गल्लीतील देवीचे आगमन झाले. आणि देवी गदगेवर विराजमान झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकता युवक मंडळ कांगळी गल्ली यांच्यावतीने नवरात्रोत्सव उत्साहात पार पाडण्यात येत आहे. येथील दुर्गा मातेची मूर्ती सुंदर आणि आकर्षक असून डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. देवीचे रूप जसे सुंदर आणि निरागस आहे. त्याचप्रमाणे त्याला साजेल असा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. यंदा एकता युवक मंडळाचे अकरावे वर्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही नवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा करत आहेत.
या नऊ दिवसात दररोज देवी समोर वेगवेगळे धार्मिक विधी पार पाडण्यात येतात. चंडीहोम, कुंकुमार्चन, यासह विविध कार्यक्रम पार पडतात. कांगली गल्लीतील महिला मंडळ आणि एकता युवक मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात.
मूर्तिकार संजय किल्लेकर हे दरवर्षी देवीची आकर्षक अशी मूर्ती साकारत असून नवरात्रोत्सवात भाविक दर्शनासाठी कांगली गल्लीत गर्दी करत असतात. सध्या कोरोनाचे संकट असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सामाजिक अंतर ठेवून आणि मागचा वापर करून दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यात बाळकृष्ण टोप्पीनकट्टी ,राजू उफळकर, लक्षण काकतकर,सदानंद हवळ,जोतिबा कांगले, बाबासाहेब हट्टीकर, ईश्वर नाईक, सिध्दार्थ भातकांडे,नगरसेविका वैशाली सिध्दार्थ भातकांडे , गल्लीतील महिला वर्ग व युवकांचे मोलाचे सहकार्य लाभते आहे.