अखेर त्यानी न्यायालयाद्वारे घेतला इमारतीचा ताबा
बेळगाव: येथील क्रांतिवीर संगोळी रायन्ना या सोसायटी मध्ये गाभाड केल्याचे उघडकीस आल्यावर त्यावर सरकारच्या वतीने जप्ती आणण्यात आली.त्यामुळे इमारतीतील सोसायटीचे काम चालू होते. ती इमारत देखील सील करण्यात आली होती .
मात्र सदर सोसायटीची इमारत भाडे तत्वावर असल्याने इमारत मालकाने आपल्याला न्याय मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर कित्येक वर्षांनी न्यायालयात सदर खटला प्रलंबित होता. मात्र आता इमारत मालक संतोष पवटे यांना न्यायालयद्वारे इमारतीचा ताबा घेतला. या कामात त्यांना वकील सचिन शिवन्नावर यांची मोलाची साथ लाभली.