भेट देऊन जाणून घेतल्या वार्डातील नागरिकांच्या समस्या
बेळगाव: केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आज दक्षिण मतदार संघातील विविध वॉर्डांना भेट देऊन येथील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी त्यांनी अनगोळ, नानावाडी, मजगाव यासह विविध ठिकाणी भेट दिली. तसेच प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना कोणत्या प्रकाराच्या सुविधा हव्या आहेत याची माहिती जाणून घेतली.यावेळी नागरिकांनीही जारकीहोळी यांना उत्तम प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
तसेच यावेळी जारकीहोळी म्हणाले की, निवडणुकीनंतर दक्षिण मतदारसंघात येऊन येथील मतदारांना भेटण्याचा विचार होता. त्यामुळे आज आम्ही पाच वॉर्डांना भेट देण्याचा निर्णय घेतला. या पुढील काळात आम्ही सर्व मतदार संघांना भेट देण्याच्या प्रयत्ननात असल्याचे सांगितले. तसेच सर्वांच्या समस्यांना जाणून घेऊन त्या निश्चित सोडवू असे आश्वासन दिले.
महानगर पालिका निवडणुकीत दक्षिण मतदारसंघात काँग्रेसच्या जास्त जागा होत्या आता ही आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यावे आणि काँग्रेसला अधिक मते मिळवी यासाठी प्रयत्न करावेत असे बोलताना सांगितले.
यावेळी ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रदीप एमजे, दक्षिण काँग्रेस ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अज्प्पा डागे, नेते परशुराम डागे, कुशाप, फजल मकानदार, रघु भुवी, आनंदा शिरोर, सलीम सनदी, इरफान अतारा, सुधीर संभाजी ,अक्षरा करोशी,अर्चना मेस्त्री, लतीफ फिराजादेह, कुर्सीद मुल्ला, चोप्रा मोमीन अनिगोला, शंकर बारामन्नावर, राघवेंद्र लोकारी, इराप्पा थिगडी, सरला सातपुते यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.