मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली पहिल्या दिवशीची दुर्गामाता दौड
बेळगाव : कोरोनामुळे आणि प्रशासनाने घातलेल्या नियमामुळे यंदाची दुर्गामाता दौड पंधरा जणांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही अत्यंत साध्या पद्धतीने गल्लोगल्ली ना फिरता निश्चित केलेल्या मार्गावरून दौड मार्गक्रमण झाली.
यावेळी सकाळी पहाटे पाच वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिव मूर्तीचे पूजन करून ध्वज चढवून आणि प्रेरणामंत्र म्हणून दौडला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी निश्चित केलेल्या मार्गावर महिलांनी आकर्षक अशा रांगोळ्या काढला होता. तसेच नागरिकांनी दौड येताच ध्वजाचे आणि शस्त्राचे पूजन करून आरती केली.
त्यानंतर शिवाजी उद्यान एसपीएम रोड येथून कपिलेश्वर मंदिर येथे दौड पोचल्यावर ध्येय मंत्र म्हणून पहिल्या दिवशीच्या दौडची सांगता करण्यात आली. आणि ध्वज उतरविण्यात आला. याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते.