शेतीविषयक कायदे रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना तालुका बेळगाव यांच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. शेती विषयक जे सरकारने कायदे केले आहेत. ते कायदे रद्द करावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
शेतीविषयक जे तीन कायदे आहेत ते रद्द करण्यासंदर्भात संपूर्ण देशात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले . त्यावेळी उत्तर प्रदेश मधील एका मंत्र्याच्या मुलाने शेतकर्यांच्या अंगावर कार चालवली. घटनेत चार शेतकऱ्यांच्या जागीच मृत्यू झाला ही घटना अतिशय हृदय पिळवटून टाकणारी होती.
या संदर्भात सरकारने कोणतेच ठोस पाऊल न उचलल्यामुळे देशभरात अशा घटना अनेक घटना घडत आहेत. तसेच हिंसाचार घडण्याची चिन्हे देखील दिसत असल्याने सदर शेती विषयक कायदे लवकरात लवकर रद्द करावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आप्पासाबा देसाई , मारुती कडेमनी, नामदेव दुदुमा निंगप्पा मयाना यांसह दोन्ही संघटनेचे सदस्य उपस्थित होते