गटार कामासाठी तीन लाखाचा निधी मंजूर
बेळगाव :बी के कंग्राळी आंबेडकर गल्ली मध्ये 15 वी वित्त आयोग योजनेतून तीन लाखाचा निधी उपलब्ध झाल्याने गटारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुवर्णा लक्कणावर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर गटार कामाचा शुभारंभ करण्यात आला.
बी के कंग्राळी येथे गटारी नसल्याने नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे 15 व्या वित्त आयोग योजनेतून तीन लाख रुपये मंजूर करून गटारीच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष अनिल पावशे, जयराम पाटील, दादासाहेब भदरगडे , तानाजी विठ्ठल पाटील, वेदिका पठाणे, रेखा इंडीकर, सेक्रेटरी सुनंदा एन
यांच्यासह बी के कंग्राळी येथील नागरिक दुर्गाप्पा कांबळे, शिवाजी कंग्राळकर, विठ्ठल मेस्त्री, श्रीकांत कंग्राळकर, बाबासाहेब कांबळे, कल्लाप्पा वळणावर, कल्लाप्पा कांबळे, दलित संघर्ष समितीचे अध्यक्ष लक्ष्मी मेस्त्री, तालुका पंचायत सदस्य त्यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.