राज्यस्तरीय बास्केट बॉल व्हील चेअर स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्हा क्रीडांगण येथे राज्यस्तरीय व्हीलचेअर बास्केट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रीडांगणावरील बास्केट बॉल मैदानावर महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हूणन खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ, उत्तरचे आमदार अनिल बेनके, बुडाचे चेअरमन होसमनी, एससी मोर्चाचे प्रमुख पृथ्वीसिंग उपस्थित होते.
प्रारंभी बेळगाव जिल्हा स्पोर्ट आणि फिजिकल हॅंडीकॅप ( अपंग विकलांग आणि दिव्यांग व्यक्ती)यांच्या वतीने रॅली काढण्यात आली होती. यावेळी दिव्यांग व्यक्तीसह प्रमुख पाहुण्यांनी रॅलीत सहभाग घेतला होता. त्यानंतर रॅली बास्केट बॉल मैदानावर आल्यावर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर बास्केटबॉल व्हीलचेअर स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी विजेत्या संघाला प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सदर स्पर्धा उत्साहात आणि आनंदात पार पडली.