बेळगाव : गांधी जयंती निमित्त पी ई असोसिएशनच्यावतीने टिळकवाडी हायस्कूलमध्ये शहर स्तरीय हॉलीबॉल आणि थ्रो बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शिक्षकांसाठी असणार असून आज आणि उद्या म्हणजे दोन आणि तीन ऑक्टोबर अशी दोन दिवस चालणार आहे.
शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी झटत असतात. बौद्धिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण देण्याचे काम शिक्षक उत्तम प्रकारे पार पाडतात. त्यामुळे यातून शिक्षकांनाही एक विरंगुळा मिळवा यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या हॉलीबॉल आणि थ्रो बॉल स्पर्धेमध्ये एकूण शिक्षकाच्या एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये हॉलीबॉल साठी 6 आणि थ्रो बॉल साठी 10 संघांनी सहभाग नोंदविला आहे. सदर स्पर्धा टिळकवाडी हायस्कूल मध्ये पार पडणार आहे.