प्रवाह पीडितांना नुकसान भरपाई द्या
बेळगाव: गोकाक तालुक्यातील अरभावी मतदार संघातील 2019 मध्ये घटाप्रभा नदीच्या प्रवाहामुळे घरे पडून नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आरटीआय कार्यकर्ता भिमाप्पा गडद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.
बुधवारी शहरातील कन्नड साहित्य भवन इथून प्रवाह पीडित लोकांनी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनामध्ये जवळ-जवळ गोकाक तालुक्यातील 800 हून अधिक प्रवाह पीडित सहभागी झाले होते. त्यानंतर चन्नम्मा सर्कल येथून बेळगाव जिल्ह्याधिकार कार्यालया समोर आंदोलन छेडून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी आरटीआय कार्यकर्ता भीमा गडद बोलताना म्हणाली की प्रवाह पीडित लोकांना लवकरात लवकर पर्याय धन मिळाले पाहिजेत.अधिवेशन मध्ये प्रवाह पीडिता संदर्भात चर्चा करून लोकांना योग्य ते पर्याय धन मिळून द्यावे .यासाठी आम्ही अहोरात्र आंदोलन करणार असल्याचे भीमा गडद यांनी सांगितले