श्री गणपती बाप्पाला आपल्या वास्तुमध्ये आणण्याचे मुहूर्ताची माहिती….
लवकरच आपले लाडके श्री बाप्पा आपल्या घरी येणार आहे आणि आपण कोणतेही शुभकार्याचा आरंभ करण्यासाठी आपण ज्या देवतेला पुजतो आणि ज्यांना प्रथम पुजेचा अधिकार प्राप्त आहे असे चौसष्ट कला, अष्टसिध्दी आणि श्री बुध्दीचे देवता असे श्री गणनती यांच्या आगमनाला काहीच दिवस राहिले आहे
आपण वर्षभर मंदीरात म्हणजे देवाच्या घरी जाऊन देवाचे दर्शन घेतो भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला रोजी श्री गणपती हे साक्षात आपल्या घरी येतात किती मोठी गोष्ट आहे ना…
शास्त्रा प्रमाणे आपण कोणतेही शुभकार्य शुभमुहूर्तावर केल्यावर ते कार्य आयुष्यभर लाभदायक होते या नुसार श्री गणपतीला विघ्नहर्ता आणि सुखकरता आपल्या घरी मुहूर्तावर आणल्यास वर्षभर येणाऱ्या विघ्नांचा नाश करेल
कोणतेही शुभ कार्याचा, नविन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात.हे मुहूर्त पुर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरु करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नाही.
मुहूर्त
शुभकर्मास योग्य असलेल्या काळासही मुहूर्त असे म्हणतात.
श्रीगणराया घरी आणण्याचे मुहूर्त:-
दिनांक ०८/०९/२०२०२१ रोजी बुधवारी भाद्रपद शुक्ल द्वितीया
आहे या दिवशी दुपारी ०३:५७ मी बलवान हस्त नक्षत्र आरंभ होत असुन ०९/०९/२०२०२१ रोजी गुरूवारी दुपारी ०२:३१ मी. पर्यत हस्त
आहे आपण या शुभ मुहूर्तावर व नक्षत्रावर श्री गणपतींची मुर्ती अनावी.
श्रीबाप्पा ला आण्याचे मुहूर्त
दिनांक ०९/०९/२०२१ रोजी गुरूवारी
वेळ:- ११:०५ ते ०१:१८ दुपारी(स्थिर वृश्चिक लग्न)
दि १०/०९/२०२१ रोजी शुक्रवार श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
वेळ:- ०४:३८ ते ०६:४५ सकाळी(स्थिर सिंह लग्न)
वेळ:- ०८:०० ते ०९:३० मी सकाळी (शुभ)
या विशेष मुहूर्तावर श्रीगणराया आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती…
स्थापना मुहूर्त माहिती
दि १०/०९/२०२१ रोजी शुक्रवार श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
ब्रह्म मुहूर्त स:-०४:११ मी पासुन ते सकाळी ११:०९ मी पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी….
कारण सकाळी ११:०९ मी पासुन ते रात्री ०९:५८ मी पर्यंत
भद्रा(अशुभ) आहेत यामुळे वरील मुहूर्तावर आनावी आणि नंतर श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी…. (मुर्ती स्थापना व पुजन विधान कसे करावे या विषयावरील लेख पुढे देणार आहे)
गणपती का बसवतात?
आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिन्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल आणि त्या मुळे गणपती ला थकवा येईल, आणि पाणि ही वर्ज्य होते अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नए म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती अकडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात शिरवले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. या काळात गणपती ला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतो.
श्रीगणराया मुर्ती कशी असावी
गणेशमूर्ती शाडू माती असावी.
तसेच ती ९ ते ११ इंचच उंचीची असावी. त्याचप्रमाणे ही गणेशमूर्ती निवडतानासुद्धा अथर्वशीर्षांत वर्णिलेल्या गणेशासारखीच असावी.
एकदन्तं चतुर्हस्तम् पाशमं कुशधारिणम् ॥ रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् । रक्तम् लम्बोदरं शूर्पकर्णकं
म्हणजेच-
एकदन्तम्- एक दात असलेला
चतुर्हस्तम्- चार हात असलेला
पाशमंकुश धारिणम्- पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातांत धारण केलेला
पाशमंकुश धारिणम्- उजव्या हातात पाश नावाचे शस्त्रे हातात धारण केलेला
पाश शस्त्र म्हणजे:-श्री गणपति वाईट गोष्टींना पाश टाकून दूर नेणारा, असा आहे.
पाशमंकुश धारिणम्- डाव्या हातात अंकुश नावाचे शस्त्रे हातात धारण केलेला
अंकुश म्हणजे:-आनंद आणि विद्या यांच्या संपादनाच्या कार्यातील विघातक शक्तींचा नाश करणारा.
व उर्वरित हातात एकात तुटलेला दात
तर दुसऱ्या हातने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा,
मोठे सुपासारखे कान, लंबोदर,
पोटाला सर्पाकार असावा
कारण
१)कटीला (कमरेला) वेटोळे घातलेला नाग
विश्वकुंडलिनी
२ )वेटोळे घातलेल्या नागाचा फणा असावा
जागृत कुंडलिनी
मूषकासहित अथवा मूषकावर स्वार असणारा, अशी गणेशमूर्ती असावी.
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी ?
पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.
घरच्या प्रमुख व्यक्तीने शकत्यो ( बिना चप्पल )घालता गणेशमूर्ती आणावी. त्याकरिता घरातून निघतानांच एक तबक, गुलाल व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे. त्यानंतर वरती वर्णिल्याप्रमाणे गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व ‘मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करीत, आणलेल्या तबकात मूर्ती घ्यावी व त्यावर रुमाल झाकावा व मुलाबाळांसहित अत्यंत आनंदाने ‘श्रीं’सह घरी यावे.
घरी आल्यानंतर दरवाजातच थांबावे. घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी त्या मूर्तीवरून ओवाळून बाहेर ठेवावी व
श्रीगणरायाची सोन्याने देवाचे औक्षण करावी व पतीच्या, मुलांच्या कपाळाला गुलाल लावून ‘गणेशा आपले सहर्ष आगमन असो’, असे म्हणून टाळ्यांच्या कडकडाटात श्रींना घरात घ्यावे. ज्या जागी स्थापना करायची, त्या जागेवर थोडय़ाशा अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी.
पुढील लेखा श्रीगणरायाचे स्थापनेचे मुहूर्त आणि प्राण प्रतिष्ठा व पुजन विधान या विषयावर माहिती देईल….
(विशेष नोंद करावी की
कृपया श्रीगणरायाच्या मुर्तीचे मोल हे अनमोल आहे जी मुर्ती आपणास आवडेल ती मुर्ती आपण घ्यावी देवाची मुर्तीची किंमत (किमी अथवा भाव) कृपया करू नये ही विनंती.)
*डॉ.स्वप्नील पुजारी.*
*वास्तुविशारद व ज्योतिषसल्लागार*
7218159666, 9372156666