वार्ड क्रमांक 18 चे अपक्ष उमेदवार शिवा चौगुले यांचा विजय निश्चित …!
बेळगाव : उद्या सकाळी महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. तर वार्ड क्रमांक 18 मधून निवडणूक लढविणारे शिवा चौगुले हे निश्चितच भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास या भागातील अभ्यासू मतदारांतून व्यक्त केला जात आहे.
शिवा चौगुले यांनी कोरोना नियमांवलींचे पालन करीत आपल्या वार्डात अवघ्या पाच जणांसह प्रचार करून मतदारांची मने जिंकली आहेत. त्यांच्या प्रचाराचे तंत्र सूज्ञ मतदारांना चांगलेच भावले असून वैचारिक पातळीचा हा उमेदवार नक्कीच निवडून येईल असा विश्वास मतदारांतून व्यक्त होत आहे.
वार्डातील चाचपणी आणि कल पाहता शिवा चौगुले हे निश्चितच विजयी होतील अशी चर्चा मतदारांतून होत आहे.