महानगरपालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी यांची मतदान केंद्रावर पाहणी
बेळगाव:महानगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी सर्व मतदान केंद्रावर भेट तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील बऱ्याच मतदान केंद्रावर प्रत्यक्ष पाहणी करून योग्य उमेदवारालाच निवडून आणून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने गांधीनगर येथील शाळा नंबर 40 मध्ये सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच मतदान केंद्रावरील सर्व सदस्य कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करावे अशा सूचना दिल्या. याप्रसंगी त्यांनी मतदान केंद्रावर कशाप्रकारे कामे चालू आहेत याची पाहणी केली