बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजता प्रारंभ झाला.सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदार दाखल झाले आहेत.सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.प्रथमच महापालिका निवडणुकीत मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला आहे.बेळगाव महानगरपालिका निवडणुक सकाळी नऊ वाजेपर्यंत 5.39 टक्के मतदान झाले आहे.भाजप,काँग्रेस,आप,एम आय एम,जे डी एस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.