मातृभाषेला शिक्षण क्षेत्रात उच्च स्थान,अयाचितलू लक्ष्मणराव
बेळगाव ता, 31 मातृभाषेला शिक्षण क्षेत्रात उच्च स्थान आहे राष्ट्र बदलायला पाहिजेत तर शिक्षण बदलायला पाहिजे शिक्षण बदलायला पाहिजेत तर शिक्षक बदलला पाहिजे म्हणूनच देशभरात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबविण्यात येत आहे, सरकारच्या मदतीविना देशभरात विद्याभारतीच्या 34 लाख शाळा कार्यरत असून विद्याभारतीतर्फे क्रियाआधारित, शिशु केंद्र व संस्कार युक्त दर्जात्मक व दर्जेदार दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न विद्या भारती करत आहे असे मनोगत विद्याभारती क्षेत्रीय सचिव अयाचितलू लक्ष्मणराव यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
.अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्या भारती कर्नाटक आयोजित राज्यस्तरीय दोन दिवशीय कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती क्षेत्रीय सचिव अयाचीतलू लक्ष्मणराव, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, विधानपरिषद सदस्य साबांण्णा तलवार व्यासपीठावर उपस्थित होते,
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती ओंकार भारतमाता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, सुजाता दप्तरदार यांनी पाहुण्यांचा परिचय तर अनंतराम कल्लूराया, गौरी देव ,कृष्णा भट्ट, आर के कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उद्घाटनाच्या सत्रात सांबण्णा तलवार, परमेश्वर हेगडे ,अयाचीतलू लक्ष्मणराव यांनी शैक्षणिक धोरणाबद्दल प्रास्ताविक मार्गदर्शन केले, दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय कार्यशाळेत जी आर जगदीश, पार्वती भट्ट, उमेश कुमार हे शिक्षकांना नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
याप्रसंगी सेवंतीलाल शाह, अँड चेतन मणेरीकर, जयंती तिनंईकर, रामनाथ नाईक, माधव पुणेकर, अशोक नेसरीकर, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, श्रद्धा पाटील, उमेश कुलकर्णी ,ज्योती कित्तूर ,नवीना शैट्टीगार,विद्यार्थी संलग्नित जिल्ह्यातील शाळा व बेळगाव शहरातील विविध माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता पेटकर उषा पालणकर तर राघवेंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.